टी-20 विश्वचषकात फलंदाजांना धडकी भरवणारे 5 विकेटकीपर 5 Best Wicket Keeper in T-20 Worldcup

टी-20 विश्वचषकात फलंदाजांना धडकी भरवणारे 5 विकेटकीपर 5 Best Wicket Keeper in T-20 Worldcup
टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होताना आपण पाहतोच. परंतु स्टंपमागे विकेटकीपर सुद्धा चांगले प्रदर्शन करण्याची संधी सोडत नाहीत. आज आपण अशाच आघाडीच्या पाच विकेटकिपरची माहिती घेणार आहोत.

MS Dhoni

या यादीत पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकूण 32 सामन्यात 21 कॅच घेतले आणि 11 वेळा फलंदाजांना स्टंप आऊट केले आहे.

Kamran Akmal

पाकिस्तानचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज कामरान अकमलने टी-20 विश्वचषकातील 30 सामन्यात 30
फलंदाजांना बाद केले. त्याने स्टंपमागे एकूण 12 कॅच पकडले तर 18 फलंदाजांना स्टंप
आऊट केले.

Dinesh Ramdin

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्टइंडिजचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश रामदीन आहे. रामदीनने 29 डावांमध्ये 29 फलंदाजांना बाद केले. यामध्ये 18 फलंदाजांना कॅच आऊट केले तर 9 फलंदाजांना स्टंप आऊट
केले.

Kumar Sangkara

श्रीलंकेचा माजी विकेटकिपर फलंदाज कुमार संगकारा दर्जेदार विकेटकिपिंगसाठी ओळखला जात होता. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 31 सामन्यांत संगकाराने एकूण 26 फलंदाजांना बाद केले. यापैकी 14 फलंदाजांना स्टंप आऊट केले तर 12 फलंदाजांना कॅच आऊट केले.

Quinton De Kock

यादीत पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटन डिकॉक आहे. डीकॉक त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकूण 18 सामन्यांत डीकॉकने 22 फलंदाजांना बाद केले आहे. यामध्ये 17 कॅच आणि 5 वेळेस फलंदाजांना स्टंप आऊट केले आहे. डीकॉक अजूनही आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे.

Best Wicket Keeper in T-20 Worldcup