Post Office Yojana 2024 पोस्ट ऑफिस योजना : प्रत्येक महिन्याला फक्त 500 रुपये जमा करा आणि मिळवा 4,12,321 रुपये, अधिक माहिती साठी पूर्ण योजना पहा. Post Office Scheme
Indian Post Office: बघितल तर पोस्ट ऑफिस च्या अश्या बर्याच योजना आहेत ज्यामधे कमीत कमी गुंतवणूकी मध्ये जास्त परतावा मिळवू शकता. Indian Post Office: जर तुम्हाला असे वाटत असेल कि पैसे कमावण्यासाठी गुंतवणूक गरजेची असते आणि गुंतवणूक ही मोठ्या रकमेचीच असावी तर असे काही नाहीये. तुमची गुंतवणुक ही तुमच्या कमाई वर अवलंबून असते. जर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीसाठी पैसे साठवत असाल तर ते पैसे खर्च होतात.
Post Office Yojana 2024
Indian Post Office Yojana 2024
पोस्ट ऑफिस च्या अश्या बर्याच योजना आहेत. ज्यामधे तुम्ही 500 रुपये पेक्षा कमी मध्ये सुरुवात करू शकता. आणि चांगला परतावा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अश्याच योजना बद्दल सांगणार आहोत.
PPF (Public Provident Fund)
Public Provident Fund: अर्थातच PPF .
PPF ही एक लॉन्गटर्म योजना आहे. यामधे तुम्ही किमान 500 रुपये पासून सुरुवात करू शकता. आणि जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत प्रत्येक वर्षी गुंतवणुक करू शकता. आणि तुमची गुंतवणूक हि पुढील 15 वर्षांसाठी असेल. आणि जर तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमची गुंतवणूक पुढील 5 वर्षांसाठी वाढवू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 500 रुपये गुंतवणूक करत असाल तर वर्षाकाठी तुमची गुंतवणुक ही 6000 रुपये होते. PPF मध्ये मिळत असलेल्या व्याजदराने म्हणजेच 7.1% ने तुमची 500 रुपये दरमहा गुंतवणूक ही 15 वर्षानी 1,62,728 रुपये एवढी होते. तसेच अजुन पुढील 5 वर्ष अजून वाढ केल्यास तुमची गुंतवणुक ही 2,66,332 एवढी होते. आणि तसेच जर 25 वर्षांसाठी केल्यास तुम्हाला 4,12,321 रुपये मिळतील.
Sukanya Smruddhi Yojana
SSY (सुकन्या समृद्धी योजना)
जर तुम्ही एका मुलीचे वडील आहात. तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजने मध्ये गुंतवणूक करू शकता. किमान 250 रुपये पासून ते 1.5 लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्ही गुंतवू शकता या सरकारी योजने मध्ये. 8.2% या व्याज दराने तुम्ही 15 वर्षांसाठी 500 रुपये दरमहा गुंतवले तर तुमची गुंतवणूक 15 वर्षासाठी 90,000 रुपये होते. आणि 8.2 व्याज दराने तुम्हाला मुलीच्या 21 व्या वर्षी 2,77,103 रुपये मिळतील.
Post Office Recurring Deposit
RD (Recurring Deposit)
Post Office Recurring Deposit: ही योजना एक PIGGY BANK सारखी आहे. या योजने मध्ये एक ठराविक रक्कम दरमहा तुम्हाला जमा करायची असते. लहान गुंतवणूकदारां साठी ही योजना खूप चांगली आहे. यामधे तुम्ही किमान 100 रुपये पासून सुरू करू शकता. एकदा गुंतवणूक सुरू केल्या नंतर तुम्ही सतत 5 वर्षांसाठी करू शकता. यामधे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर 6.7% एवढ्या व्याजदराने परतावा मिळतो. जर तुम्ही 500 रुपये दरमहा गुंतवले तर तर तुमची 5 वर्षांत 30,000 रुपये एवढी गुंतवणूक होते. तसेच 6.7% व्याजदराने तुम्हाला 35,681 रुपये मिळतील.